सुख म्हणजे आर्थिक स्थेर्य, आणि हे सुख समाजातील प्रत्येक घटकाचा समान अधिकार आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हा हक्क प्रत्येकाला मिळवून देण्याच्या हेतूने, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई जगदंबा तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने तुळजाभवानी अर्बनची स्थापना बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात करण्यात आली. तेव्हा पासून आजतागायत १८ वर्षे होऊन गेली, संस्था आपले कार्य अविरतपणे करत आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य देऊन बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे.
सेवा, सुविधा व विश्वासाच्या बळावर आज संस्थेचे 1,50,000 समाधानी ग्राहक आहेत आणि दर दिवशी हा आकडा वाढतो आहे. ग्राहकांच्या याच प्रेम व विश्वासामुळे आम्ही महाराष्ट्र व कर्नाटक मधील अनेक जिल्ह्यात 21 शाखा विस्तारित करू शकलो आणि भविष्यात अजूनही शाखा वाढीचा मानस आहे. ग्राहकांच्या सोई करीता असंख्य अत्याधुनिक सुविधा आणि जोडीला सर्व शाखेत गुण संपन्न, प्रशिक्षत कर्मचारी तत्पर सेवा देण्यास कार्यरत आहेत. ज्यातून ग्राहकांना उत्तम सेवा आणि समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संस्थेत नोकरी करण्याची संधी मिळते. परिणामी, 300 हुन अधिक कुटुंबाना आधार देऊन, त्यांचा उदर निर्वाह करण्याचे सत्कार्य संस्थेच्या माध्यमातून होत आहे. सोबतच, समाजाप्रती आपले कर्तव्य म्हणून संस्था वेळोवेळी काही सामाजिक उपक्रम देखील राबवते. जसे की, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, ग्रामीण भागातील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप, शहरातील स्वछतेसाठी कचराकुंडी वाटप, इत्यादी. एकंदरीत, 'जिथे कमी तिथे आम्ही' हीच संस्थेची भूमिका असते.
छोट्याशा रोपट्या पासून झालेली ही सुरवात आज ग्राहकांच्या सहकार्य, विश्वास आणि थोरा मोठयाच्या आशिर्वादामुळे भव्य वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. येत्या काळातही ग्राहकांना तुळजाभवानी संस्थेमार्फत आम्ही सावली रुपी सर्वोत्तम सेवा देण्याची हमी देतो.
आधुनिक तंत्रज्ञान व नवसंकल्पनांच्या साह्याने व्यक्ती व समाजाचे जीवनमान उचांवण्यासाठी सतत कार्यरत राहणे.
जबाबदारी । ग्राहकसेवा सर्वप्रथम सद्भावना । सतत सुधारणेसह वैयक्तिक उत्पादता । संघभावना.
4000 कोटी कर्ज । 6000 कोटी ठेवी 10,000 कोटी व्यवसाय । 100 शाखा 10 विभाग । 1000 कर्मचारी 10 कोटी प्रति कर्मचारी व्यवसाय 100 कोटी प्रतिशाखा व्यवसाय
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई जगदंबा तुळजाभवानीच्या कृपा आशीर्वादाने आम्ही १८ वर्षांपूर्वी एक शिवधनुष्यच पेललं. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे ऋण व्यक्त करण्यासाठी, आपला आधार रुपी खारीचा वाटा म्हणून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक क्रांती घडून आणण्याच्या हेतूने 'तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी'ची स्थापना करण्यात आली. पुढील काळात असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन करत, संस्थेने ज्या गतीने प्रगती केली आहे ती पाहता मला खात्री आहे की लवकर संस्था आपल्या ध्येयाचं शिखर गाठेल.
संस्थापक, तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव
समाज एकीकडे दिवसेंदिवस प्रगती करतो आहे, तर दुसरीकडे आजही आर्थिक दुर्बलता पाहायला मिळते, हीच दरी नष्ट कण्यासाठी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अर्थ सहाय्य देऊन, बँकिंगच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने 'तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी' सुरु करण्यात आली होती. तो हेतू काही प्रमाणात का होईना आज पूर्ण होताना दिसतो आहे. आज संस्थेचे १ लाख ५० हजारहून अधिक समाधानी ग्राहक आहेत, शिवाय संस्थेच्या एकूण 21 शाखा 8 जिल्ह्यामध्ये कार्यरत असून दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत आहेत. सहकार क्षेत्रात समाजाच्या अश्याच सर्वांगीण विकासासाठी आम्ही कायम बांधील आहोत.
मुख्य कार्यकारी अधिकारी, तुळजाभवानी अर्बन मल्टिस्टेट को- ऑप क्रेडिट सोसायटी लि. माजलगाव